Address: gultekadi, Pune
बाजार समितीचा मूळ उद्देश् शेतकर्यांच्या शेतीमालांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात न्यायव्यवस्था प्रस्थापित करणे, व त्या अनुषंगाने गरजा पूर्ण करणे, त्याच बरोबर शेतकर्यांच्या शेतीमालाची विक्री व्यवस्था निर्माण करून शेतीमालास योग्य भाव मिळवून देणे हा आहे.
कार्य
१) बाजार आवारात शेतीमाल खरेदी-विक्री व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवणे,
२) शेतकर्यांच्या शेतीमालाविषयी हित संरक्षण करणे,
३) शेतीमालाची उघड लिलाव पद्धतीने विक्री करणे.
४) बाजार आवारात विक्रीस आलेल्या शेतीमालाचे चोख वजनमाप करणे,
५) शेतकर्यांना शेतीमाल विक्रीचे २४ तासात पैसे मिळवून देणे,
६) विवादाची विनामुल्य तड़जोड़ करणे,
७) शासनाने निश्चित केलेल्या शेतीमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात शेती मालाची खरेदी-विक्री व्यवहार होणार नाहीत याची दक्षता घेणे,
८) शेतीमालाची प्रत व दर्जा वाढविण्यासाठी शेतकर्यांना उत्तेजित करणे,
९) आड़ते / व्यापारी, हमाल, तोलणार, मदतनीस, प्रक्रियाकार यांना अनुज्ञप्ति देणे, अनुज्ञप्ति नुतनीकरण करणे, रद्द करणे इ. व
१०) बाजार समिती कायदा व नियमातील तरतुदीनुसार अनुज्ञप्तिधारी यांच्या हिशोबाच्या नोंदवह्या व अनुषंगिक कागदपत्रांची तपासणी करणे व हिशोब / बिलपट्ट्या प्रमाणित करणे.
मोबाईलद्वारे शेतीमालाची आवक व बाजारभावाची माहिती (SMS Market Rate Info)
एस. एम. एस. मार्केट रेट इन्फो
शेतकरी, व्यापारी, सर्व सामान्य ग्राहक किंवा कोणत्याही बाजार घटकाला त्यादिवशी जाहीर झालेले बाजार भाव तात्काळ उपलब्ध व्हावेत यादृष्टीने बाजार समितीने एस एम एस द्वारे संबधितांना बाजार भाव या योजनेद्वारे उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये प्रत्येक शेतीमालास एक कोड नंबर दिलेला असून त्याद्वारे, त्या कोड नंबरला PAPMC असे टाईप करून त्यापुढे सदर शेतीमालाचा कोड नंबर नमूद करून सदरचा मेसेज ९७११९८१९८१ या नंबरवर पाठविल्यास(send) त्या शेतीमालाची आवक व किमान आणि कमाल बाजार भाव उपलब्ध होणार आहेत.
शेतीमालाचे कोड नंबर येथे क्लिक केल्यास माहिती उपलब्ध होईल.
बाजारभाव
Address:
Krushi Utpann Bajar Samiti, Gultekadi, Pune, maharashtra
Website: http://www.puneapmc.org